करिना कपूरची छोट्या नवाबच्या जन्मानंतर झाली अशी अवस्था, चेह-यावर दिसतोय थकवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 06:00 PM2021-04-07T18:00:24+5:302021-04-07T18:08:37+5:30

Kareena Kapur Fitness Routine: करीना कपूर योगा करत स्वतःला फिट ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. भारतीय जेवणच करणे ती पसंत करते.

करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.

योगा करतानाचा तिचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले होते.

करिना कपूर नेहमीच तिची काळजी घेते, फिट राहण्यासाठी नित्यनियमाने योगा करते.

योग्य आहार घेते, विशेष म्हणजे जेवणात भारतीय पद्धतीचे जेवणालाच जास्त पसंती देते.

प्रेग्नंसीमध्येही तिने योग्यरितीने स्वतःची काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावरही तिने तिची प्रत्येक अपडेट चाहत्यांसह शेअर करायची.

विशेष म्हणजे बेबो करिनाला सतत कामात व्यस्त राहायला आवडते.

प्रेग्नंसी दरम्यान याच गोष्टीची प्रचिती आली होती.

अगदी शेवटपर्यंत करिना काम करताना दिसली होती.

इतकेच नाही तर बाळाच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यातच ती घराबाहेर पडली.

पुन्हा एकदा करिनाने शूटिंगला सुरुवात केली आहे.फार काळ विश्रांती न घेता ती काम करताना अधिक पाहायला मिळते.