करीना कपूरने शेअर केला बिकनीमधील मिरर सेल्फी, फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:35 PM2021-09-24T20:35:17+5:302021-09-24T20:35:17+5:30

करीना कपूरने नुकतेच व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री करीना कपूरने तिचा नवरा सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान सोबत ४१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली आहे.

इंस्टाग्रामवर बरेच सेल्फी आणि फोटो करीनाने शेअर केले आहेत. करीना कपूरचे मालदीव व्हॅकेशन्स अविस्मरणीय आठवणी आणि चांगल्या फोटोंनी परिपूर्ण आहे.

इंस्टाग्रामवर लिहिले की शानदार सुट्टी आहे. करीनाने एक बाथरूम मिरर सेल्फी शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या रंगाच्या स्विमवेअरमध्ये दिसते आहे.

करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, चला उन्हाळा संपला आहे आणि हिवाळ्याला सुरूवात होते आहे.

करीना कपूरने एक मिरर सेल्फी शेअर केला आहे, ज्यात तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केलेली दिसते आहे. त्यासोबत तिने व्हाइट शर्टदेखील घातला आहे.

करीना कपूरने २१ सप्टेंबरला तिच्या ४१ व्या वाढदिवसाचा फोटो देखील शेअर केला.