एखाद्या डॉलप्रमाणे दिसते कपिल शर्माची मुलगी, तिचे फोटो पाहून म्हणाल So Cute

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 08:00 AM2020-04-04T08:00:00+5:302020-04-04T08:00:04+5:30

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्याला मुलगी झाली असून तिचे नाव अनायरा आहे.

अनायराचे अनेक फोटो आपल्याला कपिलच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

कपिल नेहमीच आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याच्या मुलीचे काही फोटो त्याच्या फॅन्सच्या भेटीस आले असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अनायराचा जन्म १० डिसेंबरला झाला असून कपिलनेच ही गुड न्यूज सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना दिली होती.

गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली.

कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमुळे कपिलला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने द कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कपिलने त्या दोघांचे नाते जगजाहीर केले होते.