काजल अग्रवालने शेअर केले अंडरवॉटर रोमान्स करतानाचे फोटो, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले नवदाम्पत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 02:36 PM2020-11-17T14:36:36+5:302020-11-17T14:43:31+5:30

अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नानंतर तिच्या हनिमूनच्या फोटोंमुळे सतत चर्चेत आहे. काजलने तिचा बॅक टू बॅक हनिमूनची एक नव्हे तर बरेच फोटो पती गौतम किचलूसोबतचे चाहत्यांसह शेअर केली आहेत.

सध्या सोशल मीडियावर याच फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काजल अग्रवाल पती गौतम किचलूसोबत मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत.

शेअर केलेल्या या नवीन फोटोंमध्ये ती स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

काजल यावेळी बोल्ड बिकिनीमध्ये दिसत असून पहिल्यांदाच तिने इतका बोल्ड फोटो शेअर केला आहे.

काजल आणि गौतम या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घालत आहेत.

काजल चाहत्यांना तिच्या हनिमूनदरम्यान ती एन्जॉय करत असलेले सगळे आनंदाचे क्षण चाहत्यांसह शेअर करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्न केले.

काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.

Read in English