काजल अग्रवालचा गौतम किचलूसह अंडरवॉटर हनीमून,बेडरूमचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 03:40 PM2020-11-12T15:40:09+5:302020-11-12T15:46:30+5:30

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं. या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. ते कपल होते काजल अग्रवाल आणि गौतम किचलू नवदाम्पत्य सध्या मालदीव्हजमध्ये त्यांचे हनीमून एन्जॉय करत आहेत.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी आपल्या 10 वर्षांच्या मैत्रीला एक सुंदर नात्याचे नाव दिले आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता दोघांनीही हनिमून ट्रिपचे फोटोही आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत.

काजलने अनेक मालदीव्हजचे फोटो पोस्ट केली आहेत. एका फोटोत ती गौतमसह रोमँटीक पोज देताना पाहायला मिळत आहे. अंडवॉटर असलेल्या हॉटेलमध्ये दोघेही क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

काजल आणि गौतम अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.काजलने एक सुंदर बॅकलेस निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, तर गौतम कॅजुअल डेनिम पॅन्ट आणि शर्ट परिधान करताना दिसत आहे.

30 ऑक्टोबर रोजी काजल आणि गौतमचे मुंबईत लग्न झाले. या सोहळ्यात फक्त जवळचे लोक सहभागी झाले होते. काजलच्या मेहंदी, हळदीपासून रिसेप्शनपर्यंतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

काजल अग्रवालने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, गौतम किचलू आणि ती जवळजवळ 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या लॉकडाऊन दरम्यान, बरेच दिवस भेटता आले नाही. जवळजवळ एक आठवडा न भेटता राहिले आहेत.

लॉकडाऊनमध्ये दोघांमध्ये आलेला दुरावा त्यांना नकोसा होता. शेवटी हीच ती वेळ म्हणत दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

गौतमने देखील त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. गौतमने हा फोटो शेअर करुन लिहिले आहे की, ''सर्व खबरदारी घेऊन पुन्हा प्रवास करताना मला आनंद होत आहे. हळूहळू आपण सर्व सामान्य जीवनाकडे वाटचाल करत आहोत.''

गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोर सजावटीशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे.

तर काजलही 'सिंघम', स्पेशल 26, 'मगधीरा'सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये काजल स्टनिंग दिसत आहे. एका फोटोमध्ये ती गौतमसोबत रोमँटिक पोज करताना दिसत आहे.