Inside Photos: ​मलबार हिल्स परिसरात आलिशान घरात राहते जुही चावला, पाहून तुम्हीही म्हणाल WOW

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 07:18 PM2021-04-14T19:18:29+5:302021-04-14T19:23:59+5:30

Inside Juhi Chawla's Fab Luxurious Home In Mumbai: प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुड अभिनेत्री जुही चावलाचंही घर असंच आलिशान आहे.

जुहीचा बंगला वीर भवन हा मुंबईतील मलाबार हिल्स येथे रिट्ज रोडवर आहे. याच घराचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोत जुही लेक जान्हवी आणि मुलगा अर्जुनसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळते.

जुहीच्या आलिशान घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी जुहीनेबरीच मेहनत घेतली आहे.जुहीला पेंटिग्सची विशेष आवड आहे.

तिने तिच्या बंगल्याच्या लिव्हिंग एरियापासून ड्राइंग रुमपर्यंत अतिशय सुंदर पेंटिंग्स लावल्या आहेत.

जुहीला संगीताचीही आवड असल्याचे फार कमी जणांना ठाऊक असावे.

याच कारणामुळे तिने तिच्या घरात एक म्युझिक रुमही तयार केली आहे.

जुहीची मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन यांचे शिक्षण मुंबईत धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

पुढील शिक्षणासाठी दोघांनाही लंडनमध्ये पाठवण्यात आले. जान्हवी आणि अर्जुन कधीही कोणत्याच बॉलिवूड पार्टी किंवा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत.

जुही अनेक ठिकाणी तिच्या पतीसोबत दिसते, तिच्या मुलांना ती लाइमलाइटपासून दूरच ठेवणे पसंत करते.