जुही चावलाची मस्करी आमिर खानला पडली होती भारी, तेव्हा, ७ वर्ष पाहिली नव्हती एकमेकांची तोंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:00 PM2021-08-23T19:00:00+5:302021-08-23T19:00:00+5:30

१९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली.

'कयामत से कयामत तक' या सिनेमाने त्यावेळी तिकीट खिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले.

राज आणि रश्मीची लव्हस्टोरी, त्यातील प्रेमगीतं, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला होणारा विरोध आणि बहरणारी लव्हस्टोरी रसिकांना भावली होती.

या सिनेमाने आमिर आणि जुहीलाही रातोरात स्टार बनवलं.

‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद.

होय,जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.

पण एक वेळ अशी आली की, आमिर व जुही दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला होता.

आमिर नेहमीच सह कलाकारांची थट्टा मस्करी करण्याची सवय होती.

'इश्क' सिनेमाच्या सेटवर आमिरने जुहीची फिरकी घ्यायचे ठरवले.

मला भविष्य कळते,असे म्हणून आमिरने जुहीचा हात पाहायचा म्हणून तिला हात पुढे करायला सांगितले.

पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला.

या प्रकारानंतर जुही इतकी संतापली होती की तिने आमिरसह बोलणे बंद केले होते.

‘इश्क’च्या शूटींग दरम्यान या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.मात्र त्यानंतर एकत्रही झळकले नाहीत.

Read in English