बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन, खऱ्या आयुष्यात असा होता इरफान, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:36 PM2020-04-29T18:36:43+5:302020-04-29T18:36:43+5:30

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले.

काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.

हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी सुतापा सिकंदर आणि त्याची दोन मुले होते.

बुधवारी इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.

दिग्दर्शक शूजित सरकारने ट्विट करीत इरफानच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते.

दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता.

त्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.