Inside Pics : वरूण व नताशाच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?
Published: January 27, 2021 12:13 PM2021-01-27T12:13:12+5:302021-01-27T12:30:27+5:30
हळदीपासून मेहंदीपर्यंत...
गेल्या 24 जानेवारीला वरूण धवनने त्याची बालमैत्रिण नताशा दलालसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. सध्या सोशल मीडियावर या शाही लग्नाचीच चर्चा आहे.
या लग्नाचे मोजके फोटो वरूणने त्याच्या आॅफिशिअल अकाऊंटवर शेअर केले होते. पण आता या लग्नाचे काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संगीत सोहळ्यातील एका फोटो वरूणची भाभी जानवी गाण्यावर ठेका धरताना दिसली.
मेहंदी सेरेमनीत वरूण व नताशाची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. वरूण व नताशा लग्नात केक कापताना दिसले.
इंटरनेटवर वरूण व नताशाच्या लग्नाच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस धवनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अनेक फोटोत वरूणने आपल्या कुटुंबीयांसोबत पोज दिल्या आहेत.
अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.
भैय्या भाभीने वरूण व नताशासोबत अशी गोड पोज दिली.
लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वरूण व नताशा एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र आत्ताआत्तापर्यंत दोघांनीही याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.
नताशा गेल्या अनेक वर्षांपासून वरुण धवनची गर्लफ्रेन्ड असली तरी तिने लाईम लाईट पासून स्वत:ला दूर ठेवले होते.
नताशा आणि वरुण दोघे एकमेकांना अगदी शालेय जीवनापासून ओळखतात. तेव्हापासून जपलेल्या मैत्रीचे रुपांतर आता लग्नात झाले.