अशिक्षित असूनही राखी सावंतची मुंबईत 15 कोटींची मालमत्ता, इतक्या कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 02:05 PM2020-11-25T14:05:26+5:302020-11-25T14:13:52+5:30

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते.

नुकतंच एक फोटो व्हायरल झाला आहे. यात तिच्या लूकमध्येही खूप फरक पडत असल्याचे पाहायला मिळतेय.

दिवसेंदिवस अधिक बोल्ड होण्याच्या नादात ती पूर्वीप्रमाणे ग्लॅमरस दिसत नाहीय.

पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.हे आतापर्यंत सा-यांनीच राखीबद्दल अनुभवले आहे.

त्यामुळे राखी सावंतविषयी आणखीन काही वेगळे सांगायला नको.

मात्र राखी सावंत बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवासही सोपा नव्हता. तिच्या वाट्याला अगदी लहानपणापासूनच संघर्ष आला.

आर्थिक अडचणीमुळे फेकलेले अन्न उचलून खाण्याचीही वेळ राखी सावंतवर आली होती.

तर कधी केवळ ५० रु साठी राखी सावंतने टीना अंबानीच्या लग्नात जेवन सर्व केले होते. तेव्हा राखी सावंत अगदी १० वर्षाची होती.

राखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला खरेदी केला आहे. या सर्वांची मिळून एकूण किंमत 11 कोटी रुपये आहे

राखीने स्वतःची राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करुन ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यावेळी तिने तिची संपत्ती 14.7 कोटी असल्याचे घोषित केले होते.

राखीने 4 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार तिच्याकडे 21.6 लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे.