आता अशी दिसते आमिर खानची पहिली पत्नी Rina Dutta, लाईमलाईटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 02:27 PM2021-04-15T14:27:59+5:302021-04-15T14:38:53+5:30

Aamir Khan Ex Wife Reena Dutta Latest Look: रीना आणि माझे लग्न १६ वर्षे चालले. आमचे नाते तुटले, तेव्हा तो क्षण माझ्या व माझ्या कुटुंबासाठी कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. आम्ही केवळ या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचे प्रयत्न केलेत.

आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची झलक 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती.

तेव्हापासून आतापर्यंत रीनाच्या लूकमध्ये बराच फरक पडला आहे. काही दिवसांपूर्वी तिचे काही फो

विशेष म्हणजे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते.

चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याची गळ निर्मात्यांनी आमिरला घातली होती.

पण आमिर ही अट मानायला तयार नव्हता. चित्रपटाच्या एका गाण्यात रीनाचा एक सीन शूट केला गेला, तेव्हा कुठे आमिर मानला.

स्टारडमच्या आधीच रीना दत्तला आपली साथीदार म्हणून निवडल्यानंतर 16 वर्षांनी या दोघांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला.

रिनापासून विभक्त झाल्यानंतर आमिरने किरण रावशी लग्नगाठ बांधली.

रिनापासून वेगळा झालो असला तरीही यामुळे दोघांमधील नातं काही संपत नाही.

रिना ही कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे आणि कायम राहील.

आम्ही कायदेशीररित्या विभक्त झालो आहोत पण कागदाचा एक तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नसल्याचे त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.