हिना खानचे स्टाईलिश वर्कआऊट पाहून मलायकाला सुद्धा विसराल, फोटो पाहून ‘दिवाने’ व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:08 PM2020-07-07T13:08:00+5:302020-07-07T13:23:14+5:30

वर्कआऊट इन स्टाइल...

टीव्ही अभिनेत्री हिना खान आपल्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते.

सध्या ती तिच्या स्टाइलिश वर्कआऊट फोटोंमुळे चर्चेत आहे.

हिना आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे, ती नियमित वर्कआऊट करते. आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओही ती शेअर करत असते.

कोरोना लॉकडाऊनमध्ये जिममध्ये जाऊ शकत नसल्याने हिना आपल्या घरातच वर्कआऊट करते. या फोटोत ती सोसायटीच्या आवारातच उन्हात वर्कआऊट करताना दिसली.

हिना या फोटोत ब्लॅक स्पोर्ट ब्रा आणि ग्रे शॉर्टमध्ये दिसते आहे. यामध्ये ती आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसते आहे. याला तिने वर्कआऊट इन स्टाइल असे हॅशटॅगही दिले आहे.

तिच्या या स्टायलिश वर्कआऊट फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.

आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली.

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने साकारेली संस्कारी बहू आजही रसिक विसरलेले नाहीत.

सोशल मीडियावर ती अ‍ॅक्टिव्ह असते .

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती.

‘बिग बॉस 11’मध्येही ती झळकली होती. या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले.

सोशल मीडियावर हिना खान ‘नागिन’ च्या 5 व्स सीझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

नुकताच हिना बॉलिवूड डेब्यू केला. तिचा ‘हॅक्ड’ हा सिनेमा अलीकडे रिलीज झाला होता.