लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:43 AM2021-04-19T11:43:51+5:302021-04-19T11:52:34+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली.

कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलने स्वप्नातही विचार केला नसेल.

तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत असे.

परंतू तिला हे सर्व हाताळता आलं नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले.

अर्श से फर्श तक यायला रानू मंडलला जराही वेळ नाही लागला.

चाहत्यांसह केलेले गैरवर्तन पाहून हिमेश रेशमियानेही नाराजी व्यक्त केली होती.

इतकेच नाही तर रानूने चाहत्यांसह असे वागायला नको होते, तिला माफी मागण्यास सांगितले होते.

पण रानूने तसे केले नाही, उलट तिचा उद्धटपण वागणं वाढतचं गेल.

रानूचे हे रुप पाहून तिला बॉलिवू़डमध्ये काम मिळणेही बंद झाले.

'एक प्यार का नगमा हे' गाणं गात रानू मंडल आज पुन्हा एकदा जुन्या आयुष्य जगते आहे.

रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ.ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.