'मी तिला कधीचं आई म्हणणार नाही', सारा अली खानने सांगितले यामागचे कारण

Published: May 14, 2021 10:37 AM2021-05-14T10:37:14+5:302021-05-14T10:53:07+5:30

सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांची जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. नेहमीच दोघांमली केमिस्ट्री आणि त्यांचे एकत्र फोटो पाहून चाहते भरभरुन पसंती देत असतात. करिना कपूरचे सासरच्या मंडळींबरोबर खूप चांगले ट्युनिंग आहे.

इतकंच काय तर सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान आणि मुलगी इब्राहिमसह खूप चांगले बॉन्डींग आहे.

या सगळ्यांमध्ये सारा आणि करिना नेहमीच त्यांच्या बॉन्डींगला घेवून चर्चेत असतात.

लग्नानंतर करिनासाठी सैफच्या मुलांसोबत नवं नातं निर्माण करणंही खूप महत्वाचं होतं.

आपल्या सावत्र आई करिनासोबत सारा मैत्रीचं नातं असल्याचं नेहमी सांगते.

असं असलं तरी सारा करिनाला कधीही आई म्हणून हाक मारत नाही.

ही गोष्ट खुद्द सारानेच एका मुलाखतीत सांगितली होती.

करिना ही आमच्यासाठी माझ्या वडिलांची पत्नी आहे.

मुळात मी करिनाची जबरदस्त चाहती असल्यामुळे आधीपासूनच मला करिना खूप आवडते.

जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सगळे मिळून एकत्र एन्जॉय करतो.

जर मी करिनाला छोटी आई असे काही म्हणाली असती तर कदाचित तिलाच ते आवडले नसते.

लग्नानंतर करिनासोबत माझे मैत्रीचे नाते अधिक निर्माण झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English