PICS: वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, कंडोमच्या जाहिरातीमुळे आली होती चर्चेत

Published: May 11, 2021 11:55 AM2021-05-11T11:55:47+5:302021-05-11T12:32:40+5:30

आमिर खानच्या जो जिता वही सिंकदर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पूजा बेदी आज आपला 51वा वाढदिवस साजरा करते आहे.ज्येष्ट अभिनेते कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा यांची लेक आहे पूजा बेदी. (Photo Instagram)

पूजाने 'विषकन्या', 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'आतंक ही आतंक' आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. (Photo Instagram)

तिने झलक दिखला जा, नच बलिये, बिग बॉस, फिअर फॅक्टर अशा रिॲलिटी शोमध्ये देखील हजेरी लावली होती. (Photo Instagram)

'अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध झाली होती. 90 च्या दशकात कंडोमची जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदी तुफान चर्चा झाली. (Photo Instagram)

पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती. (Photo Instagram)

विशेष म्हणजे त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. (Photo Instagram)

तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली. विशेष म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी लग्नबंधनात अडकली होती. 2003 साली पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी काडीमोड घेत वेगळी झाली होती.. (Photo Instagram)

पूजाला पहिल्या लग्नापासून पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर. विशेष म्हणजे पूजा तब्बल पाच पुरुषांबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. (Photo Instagram)

पूजाने फेब्रुवारी 2019 मध्ये मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. तो तिचा शाळेतील मित्र असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. (Photo Instagram)

पूजा बेदी आज सिनेमापासून लांब गेली असली तरीही आजही तिच्या बोल्ड अंदाजाने तेवढीच लोकांच्या लक्षात असते. (Photo Instagram)

पूजाची मुलगी अलिया फर्निचरवालानेही 'जवानी जानेमन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पूजानंतर आता आलिया जास्त चर्चेत असते. (Photo Instagram)

पूजा आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!