सुशांतचा मित्र संदीप सिंग विरोधात पोलिसांत तक्रार दाखल, समोर आले धक्कादायक कारण

Published: June 29, 2020 04:11 PM2020-06-29T16:11:33+5:302020-06-29T16:11:33+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला घेऊन रोज नवे खुलासे होतायेत. याच दरम्यान सुशांतचा चुलत भाऊ निलोत्पल मृणालने फिल्म निर्माता संदीप सिंग विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मीडियाशी बोलताना संदीपने बॉलिवूडला “क्लीन चिट” दिली आणि “ सुशांतच्या मृत्यूला सामान्यपणा” म्हटले, असा आरोप करत सुशांतच्या भावाने संदीप सिंगच्या विधानांवर आक्षेप घेतला आहे.

निलोत्पलचे म्हणणे आहे की, मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि आतापर्यंतच्या कोणत्याही प्रकरणात क्लीन चिट दिली गेली नाही आणि अशा परिस्थितीत संदीप सिंगचे सुशांतच्या मृत्यूला सामान्य मानणे योग्य नाही.

निलोत्पलने पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या पत्रानुसार, संदीपने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुशांतच्या निधनानंतर त्याला अनेक मोठ्या लोकांचे फोन आले होते. संदीपला फोन करणारी ती लोक नेमकी कोण आहेत आणि त्यांच्या दबावाखाली येऊन तो अशी वक्तव्य करतोय का ?

निलोत्पलने घरी असणाऱ्या नोकरांची आणि जवळच्या मित्रांच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्याचीही मागणी केली आहे.

निलोत्पलने मृणाल सुशांत सिंग राजपूतचा चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरज कुमार सिंग यांचे खास मित्र आहे.

सुशांतच्या निधनाने त्यांचे कुटुंब आणि चाहते अजूनही दु:खात आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!