सावलीप्रमाणे रेखा सोबत असते ही व्यक्ती, अमिताभ सारखीच आहे तिची स्टाईल, कोण आहे 'ती '?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:59 PM2021-04-14T15:59:08+5:302021-04-14T16:05:20+5:30

Rekha is most of time seen with this look-a-like of Amitabh,आजही रेखा यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु असला तरी फरजाना मात्र सदैव त्यांच्यासोबत अशीच शेवपर्यंत साथ निभावणार हे मात्र नक्की.

रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं.

सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला.

मात्र रेखा यांच्या आ अशी एक व्यक्ति आहे जीने आजवर काधिच रेखा यांची साथ सोडली नाही. जिथे रेखा जातात तिथं त्यांचा सोबत ती व्यक्ती असतेच.

ती व्यक्ती आहे रेखा यांची सेक्रेटरी फरजाना.गेल्या ३२ वर्षापासून फरजाना रेखा यांच्यासोबत आहे.

फरजाना हे महिला असली तरी तिचे राहणीमान अगदी पुरुषांसारखेच आहे.

फरजानाने ही अमिताभ यांच्याप्रमाणे हेअर स्टाईल ठेवते. पुरुषांप्रमाणे कपडे परिधान करते त्यामुळे रेखा सोबत असताना नेहमीच ती चर्चेचा विषय ठरते.

फरजाना केवळ अशी व्यक्ती आहे जिला रेखाच्या आयुष्याबद्दल सर्व काही माहिती आहे.

असे म्हणतात की रेखा जेव्हाही बेडरुमध्ये असतात तेव्हा कोणालाच त्यांच्या रुममध्ये जाण्याची परमिशन नसते.

पण केवळ फरजाना अशी व्यक्ती आहे जी कधीही रेखा यांच्या बेडरुममध्ये ये जा करू शकते.रेखा फरजानाला त्यांच्या सोल सिस्टर मानतात.

आजही रेखा यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु असला तरी फरजाना मात्र सदैव त्यांच्यासोबत अशीच शेवपर्यंत साथ निभावणार हे मात्र नक्की.