‘फॅमिली मॅन 2’च्या ‘राजी’ने नाकारले अनेक बॉलिवूड सिनेमे; सामंथाला कशाची आहे भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:00 AM2021-06-17T08:00:00+5:302021-06-17T09:55:34+5:30

Samantha Skkineni : साऊथ स्टार सामंथा अक्कीनेनी सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे ‘फॅमिली मॅन 2’. या सीरिजमध्ये सामंथाने मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड कामगिरी केलीये.

साऊथ स्टार सामंथा अक्कीनेनी सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे ‘फॅमिली मॅन 2’. होय, या सीरिजमधे सामंथाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करताना लोक थकत नाहीयेत.

या सीरिजमध्ये सामंथा मनोज वाजपेयीवरही भारी पडली. मनोज वाजपेयीपेक्षाही सामंथाने साकारलेल्या राजी या भूमिकेचे कौतुक झाले.

साहजिकच, या सीरिजनंतर सामंथाला बॉलिवूडमध्ये पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी सामंथाने कुठलाही हिंदी सिनेमा साईन केलेला नाही.

याआधीही अनेकदा तिच्याकडे हिंदी सिनेमाच्या ऑफर आल्यात. पण एका भीतीपोटी तिने या ऑफर धुडकावून लावल्यात. खुद्द सामंथाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

मला हिंदी व्यवस्थित येत नाही. साऊथ इंडस्ट्रीत मी अनेक वर्षांपासून काम करतेय. त्यामुळे या इंडस्ट्रीला मी अगदी चांगल्याप्रकारे ओळखते. पण बॉलिवूडबद्दल तसे नाही. ज्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही, अशी गोष्ट करताना मला थोडी भीती वाटते, असे ती म्हणाली होती.

बॉलिवूडमध्ये टॅलेंटची भरमार आहे. या टॅलेंटशी मी मॅच करू शकेल की नाही, असेही अन्य एका मुलाखतीत ती म्हणाली होती.

सामंथा रिअल लाईफमध्ये अतिशय बोल्ड व बिनधास्त आहे. सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

2017 मध्ये सामंथाने टॉलिवूड सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत थाटामाटात लग्न केले होते. त्याआधी सामंथा व साऊथ सुपरस्टार सिद्धार्थसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती.

श्रुती हासनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थ सामंथाच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते.

यानंतर सामंथा व सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. अर्थात दोघांनीही या नात्याची कधीच कबुली दिली नाही.

चर्चा खरी मानाल तर, सिद्धार्थसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय सामंथाचा होता. सामंथाने आपल्या म्हणण्यानुसार राहावे, वागावे असे सिद्धार्थला वाटे. हेच त्यांच्या दोघांच्या ब्रेकअपचे कारण ठरले.

या ब्रेकअपनंतर सामंथाने तिच्या कामावर फोकस केला. यानंतर तिच्या आयुष्यात नागा चैतन्यची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!