दिया मिर्झाइतकीच सुंदर दिसते वैभव रेखीची पहिली पत्नी, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:00 AM2021-04-10T06:00:00+5:302021-04-10T06:00:02+5:30

दीया मिर्झा काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने नुकतेच वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. वैभव हा व्यवसायिक असून त्याचे देखील हे दुसरे लग्न आहे.

दिया मिर्झाने आपला बेबी बम्पसोबतचा सुंदर फोटो पोस्ट करत प्रेग्नेंट असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर दिया हनिमूनवर गेली असता तिथूनच दियाने हा फोटो शेअर केला होता.

दिया हनिमूनला जाताना तिचा पती वैभव रेखीच्या मुलीला सोबत घेऊन गेली होती. त्यामुळे तिचे चांगलेच कौतुक झाले होते.

वैभवची पहिली पत्नी सुनैना असून ती दिसायला खूपच सुंदर आहे.

सुनैना रेखी ही योगा कोच आहे.

बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते.

अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

सुनैना प्रचंड फिट असून एखाद्या अभिनेत्रीसारखी तिची फिगर आहे.

सुनैना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

सुनैनाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ती, दिया आणि वैभव त्यांची मुलगी समायराचा वाढदिवस साजरा करताना दिसले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुनैनाचे चांगलेच कौतुक नेटिझन्सने केले होते.