अशिक्षित असूनही या मराठी अभिनेत्रीकडे मुंबईत आहे १5 कोटींची संपत्ती, इनकम सोर्स जाणून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 06:00 AM2020-09-17T06:00:00+5:302020-09-17T06:00:00+5:30

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते.

ग्लॅमरच्या या दुनियेत बरेच कलाकारांचे शिक्षणही पूर्ण झालेल्या नसलेल्या कलाकारांची यादी तशी मोठीच आहे. याच यादीत गणली जाते ती आयटम गर्ल राखी सावंत.

राखी सावंतनेही तिचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

राखी सावंतने 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा तिने तिची शैक्षणिक माहिती दिली होती. तेव्हाही राजकारणात राखीची नौटंकी बरीच गाजली होती.

राखीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी आज कोट्यावधीची मालकीण आहे.

यावेळी तिने तिची संपत्ती 14.7 कोटी असल्याचे सांगितले होते. राखीकडे 21.6 लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे. साडे सात लाखांची ज्वेलरी आणि 53 लाख रुपये बँक बॅलेन्स असल्याचे म्हटले होते.

मुंबईत 11 कोटींची मालमत्ता आहे.मुबंईत तिची आई जया यांच्यासोबत राखी राहाते. राखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला खरेदी केला आहे.

या सर्वांची मिळून एकूण किंमत 11 कोटी रुपये आहे. तिच्या एका बंगल्याची किंमत 1.32 कोटी रुपये आहे. येथे तिचे ऑफीस आहे.

मुंबईत एका कॉम्पलॅक्समध्ये तिचा 7 कोटींचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2012 मध्ये खरेदी केला होता.

याशिवाय ओशिवरा बस डेपोच्या जवळील इम्पीरियल हाइट येथे 2.8 कोटींचा दुसरा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2002 मध्ये खरेदी केला होता.

राखीची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी राखीकडे आज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीइतकाच पैसा आहे.

राखीने जिस देश में गंगा रहता है, मैं हूँ ना, दम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती कधीच महत्त्वाच्या भूमिकेत झळकली नाही. बिग बॉस या कार्यक्रमात देखील तिने हजेरी लावली होती.