दीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क!!

By रूपाली मुधोळकर | Published: September 30, 2020 07:03 PM2020-09-30T19:03:32+5:302020-09-30T19:18:31+5:30

‘माल’, ‘पनीर’ म्हणजे काय?

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी गेल्या शनिवारी बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण एनसीबीपुढे हजर झाली. या चौकशीत दीपिकाने अशा काही कोड वर्डची माहिती दिली की, एनसीबी अधिकारीही हैरान झालेत. मी सिगारेट ओढते पण ड्रग्ज घेत नाही, असा दावा दीपिकाने यावेळी केला.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने दीपिकाला ‘माल’ म्हणजे नक्की काय? असा सवाल केला. दीपिकाने एका चॅटमध्ये ‘माल’ शब्दाचा वापर केला होता. यावर ‘माल’ म्हणजे सिगारेट असे दीपिकाने सांगितले. आम्ही सिगारेटला माल म्हणतो. सिगारेटसाठी हा कोडवर्ड वापरतो, असे दीपिका म्हणाली.

हॅश म्हणजे काय? यावर दीपिकाचे बॉलिवूडमध्ये हॅशचा अर्थ सांगितला. पातळ सिगारेटला आम्ही ‘हॅश’ म्हणतो तर जाड सिगारेटला आम्ही ‘वीड’ असे उत्तर दीपिकाने दिले.

बॉलिवूडमध्ये अनेक कोड वर्ड्सचा वापर होतो. यापैकी दोन कोड वर्ड्स खास आहेत. ते म्हणजे, ‘पनीर’आणि ‘क्विकी अँड मॅरेज’.

‘क्विकी अँड मॅरेज’ या कोड वर्डचा अर्थ दीपिकाने सांगितला. याचा वापर लॉन्ग आणि शॉर्ट टर्म रिलेशनशिपसाठी होतो.

क्विकी म्हणजे शॉर्ट रिलेशनशिप आणि मॅरेजचा अर्थ लॉन्ग रिलेशनशिप होतो. बॉलिवूडमध्ये रिलेशनशिपच्या बाबतीत सर्रास या शब्दाचा वापर होतो, अशी माहिती दीपिकाने दिली.

‘पनीर’ या कोड वर्डचा अर्थ काय तर सडपातळ लोक. होय, दीपिकाने सांगितल्यानुसार, सडपातळ लोकांना पाहून बॉलिवूडमध्ये सगळे त्यांना पनीर बोलवतात.

बॉलिवूडमध्ये एकमेकांशी बोलताना अनेकजण कोडवर्डचा वापर सातत्याने करतात, असा दावाही तिने केला.

एनसीबीने गेल्या शनिवारी दीपिकाची चौकशी केली. यावेळी आपण ड्रग्ज कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, असे ती म्हणाली.

रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांनी एकाच प्रकारचे जबाब दिल्याचा दावा एनसीबीने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने ज्या चार अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे, एनसीबीने त्यापैकी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.

Read in English