DDLJ@25: ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’चे हे सीन्स तुम्ही कधीही पाहिले नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:15 PM2020-10-20T15:15:00+5:302020-10-20T15:21:12+5:30

‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण झालीत. सिनेमातील अनेक सीन्स तुम्ही एकदा नाही तर अनेकदा पाहिले असतील. पण असेही काही सीन्स आहेत, जे कधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. म्हणजे जे शूट झालेत पण ऐनवेळी चित्रपटातून गाळण्यात आलेत.

सिमरन कुलजीतला जखमांवर मलम लावते, हा सीन्स डीडीएलजेमध्ये नाही. ऐनवेळी हा सीन चित्रपटातून गाळण्यात आला.

या सीनमध्ये सिमरन स्टीम घेते. या सीनमध्ये सिमरन व तिच्या आईमधला संवाद आहे. तुझे क्या जरूरत है अपना रंग साफ करने की, और साफ हो भी गया तो तुझे कौन सा क्वीन एलिजाबेथ बनना है. अपने देशही तो वापस जाना है. वहां गेहूं जैसा रंग बहुत पसंत करते है. जैसे तेरा है, असे आई सिमरनला म्हणते. हा सीन शूट झाला पण नंतर चित्रपटातून गाळण्यात आला.

या सीनमध्ये सिमरनचे वडील बलदेव सिंह चौधरी म्हणजेच अमरिश पुरी, त्यांची पत्नी व लहान मुलगी पूजा करताना दिसतात. मात्र सिमरन उशीर होतो. अशात ती धावतपळत पूजेसाठी येताना दिसते. याचदरम्यान डोअर बेल वाजते आणि बलदेव सिंह दरवाजा उघडायला जातो. तेव्हा सिमरनची लहान बहीण तिला टोमणा मारते. फिर से लेट.. व्हेरी बॅड... हा सीन तुम्हाला चित्रपटात दिसला नसेल.

सिमरन युरोप ट्रिपवर जाते तेव्हा बलदेव सिंह तिला सोडायला स्टेशनवर येतात. ‘मैं जानता हूं बेटा की तुम बडी हो गई हो. फिर भी पहली बार तुम इतनी दूर, इतने दिनों के लिए जा रही हो. इसलिए दिल डरता है की कहीं कोई ऐसी वैसी बात न हो जाए. बस बेटा मेरे भरोसे को कभी शर्मिंदा मत करना,’ असे बलदेव सिंह सिमरनला म्हणतात. हा सीनही शूट झाला पण चित्रपटातून डिलीट केला गेला.

राज व सिमरन चोरून लपून टेरेसवर भेटतात, असा एक सीन चित्रपटात आहे. पण टेरेसवरचा आणखी एक सीन चित्रपटात नाही. यात राज सिमरनला म्हणतो, ‘सिमरन तुम मेरा इम्तिहान क्यों ले रही हो. सबकी सहमती है सिर्फ तुम्हारे बाप को छोडकर. एक ढंग का बाप नहीं चुन सकती थीं. तुम नहीं जानती की उनका और मेरा कितना पुराना रिश्ता है. मैं 100 तीर्थ यात्राएं भी कर लूं तो कोई फर्क नहीं पडनेवाला.’

या सीनमध्ये राज सिमरनला कहाणी ऐकवत असतो. लडका बिल्कुल अकेला खडा हुआ था. ट्रेन चलने वाली थी, सीटी भी बज चुकी थी. तभी लडकी दिखाई दी. दूर से भागी चली आ रही थी. ट्रेन चलने लगी छुक छुक छुक छुक़ लडकी भी उसके साथ भागने लगी और फिर उसने अपना हाथ बढाया. लडके ने उसका हाथ पकडकर खींच लिया, असे राज सांगतो. यावर आगे क्या हुआ, असे सिमरनची चाची विचारते. यावर आगे एक बुड्ढा आ गया...लडकी बाप... असे राज म्हणतो. हा सीनही सरतेशेवटी चित्रपटातून गाळण्यात आला.

या सीनमध्ये सिमरनची आई पतीला सिमरनच्या प्रेमाबद्दल सांगते. ती म्हणते, आपने मुझसे पूछा था की सिमरन उसे भूली है की नहीं और मैंने कहा था की वो आहिस्ता आहिस्ता सब भूल जाएगी. मैं गलत थी. वो उसे भूली नहीं है. वो उससे अब भी बहुत प्यार करती है.अगर सिमरन उसे इतना प्यार करती है तो आपको नहीं लगता की हमें एक बार उसे पूछ लेना चाहिए. शायद लडका भी अच्छा हो... लाजोची ही गोष्ट ऐकून बलदेव सिंग भडकतो आणि सिमरन से ज्यादा आज तुमने मुझे शर्मिंदा किया है, असे म्हणतो.