बॅक टू बॅक या सिनेमांमध्ये बिझी आहेत अमिताभ बच्चन, दोन सिनेमांना तर कधीपासून आहे मुहूर्ताची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:55 PM2020-07-13T13:55:23+5:302020-07-13T14:02:58+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण देश त्यांच्यासाठी सध्या प्रार्थना करतोय. येत्या काळात त्यांचे एक दोन नव्हे तर 9 सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

झुंड - ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या सिनेमात अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये आहेत. हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. मात्र कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे.

चेहरे - इमरान हाश्मीसोबत अमिताभ ‘चेहरे’ या सस्पेन्स थ्रीलर सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटातील अमिताभ यांचे नवे लूक पाहून चाहते आतुरतेने या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

ब्रह्मास्त्र - आलिया भट व रणबीर कपूर या जोडीच्या या सिनेमाकडे प्रेक्षक नजरा लावून बसले आहेत. यात अमिताभ एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल अशी शक्यता आहे.

आंखे 2 - अमिताभ बच्चन यांच्याच ‘आंखे’ या सुपरहिट सिनेमाचा सीक्वलही आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या हा सिनेमा प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे.

तेरा यार हूं मैं - अमिताभ यांचा एक तामिळ सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे तामिळ नाव ‘उरिंधा मनिथन’ आहे. याचेच हिंदी व्हर्जन ‘तेरा यार हंू मैं’ नावाने रिलीज होणार आहे.

पोन्नियन सेल्वम - मणिरत्नम यांच्या या सिनेमात अमिताभ यांची एन्ट्री होऊ शकते. अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण अमिताभ यांची एन्ट्री पक्की मानली जात आहे.

शूबाईट - शूजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. लवकरच तो रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे.

आर बल्की यांचा सिनेमा - आर बल्की यांच्या आगामी सिनेमातही अमिताभ यांची वर्णी लागल्याची खबर आहे. अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

टाईम मशीन - बिग बी यांचा हा सिनेमा अनेक वर्षांपासून रिलीजसाठी तयार आहे. मात्र अद्याप या सिनेमाला मुहूर्त सापडलेले नाही