Raj Kundra: राज कुंद्रा दररोज करायचा नवी चालाखी; पॉर्नोग्रोफी प्रकरणात पोलिसांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:26 PM2021-07-23T14:26:31+5:302021-07-23T14:32:53+5:30

Raj Kundra Arrested: शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला पोलिसांनी पॉर्नोग्रोफी प्रकरणात अटक केली आहे. कोर्टानं राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा(Raj Kundra) याला पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अश्लिल सिनेमा बनवून काही अँपच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्राला अटक केल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

आता या प्रकरणात ही माहिती समोर आलीय की, राज कुंद्रा Hotshot वर पॉर्न फिल्म बनवण्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन Whatsapp ग्रुप बनवत होता. तर दुसरीकडे राज कुंद्रा या उद्योगासाठी सावधपणे पाऊलं उचलत होता. आपण करत असलेल्या कृत्यामुळे क्राईम ब्रान्च आपल्यावर नजर ठेऊन आहे. ते कधीही छापेमारी करू शकतात त्यासाठी राज कुंद्राच्या आयटी टीमने २ टीबी डेटा डिलीट केला होता.

राज कुंद्रा Hotshot App च्या शूटसाठी रोज नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनवत होता. ज्या दिवशी शूट असायचं ग्रुपचं नाव त्यादिवशी सर्वात वर ठेवलं जायचं. न्यूज १८ नुसार, आर्टिस्टचे नाव न्यूड लिहून सेव्ह केले होते. तर मुंबई पोलिसांच्या तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

फेब्रुवारीत या प्रकरणावर FIR दाखल झाला त्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठसह काही आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यावेळी राज कुंद्राने त्याच्या वियान कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या सर्व्हरवरून जवळपास २ टीबीचा डेटा गायब केला होता.

मुंबई क्राईम ब्रान्चचे हात आपल्या जवळ पोहचतील असं राज कुंद्राला वाटत होतं. त्यामुळे त्याने आयटी टीमच्या सहाय्याने हा सर्व डेटा डिलीट करून टाकला. हा तोच सर्व्हर आहे. ज्याठिकाणी अश्लिल व्हिडीओ फायनल होऊन लंडनच्या केरेनिन कंपनीला पाठवला जात होता.

बुधवारी रात्री छापेमारीत पोलिसांना हा सर्व्हर सील केला. क्राईम ब्रान्चने डिलीट केलेला डेटा रिकवर करण्यासाठी त्याला FSL ला पाठवला आहे. या सर्व्हरमधून आतापर्यंत किती व्हिडीओ लंडनला पाठवण्यात आले याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

क्राईम ब्रान्चनं आतापर्यंत १०० हून अधिक व्हिडीओ जप्त केले आहेत. त्याचसोबत मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यात इलेक्ट्रोनिक पुरावाही आहे. या पुराव्यानुसार राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीला बॉलिवूडप्रमाणे मोठ्या स्तरावर न्यायचं होतं.

इतकचं नाही तर राज लाईव्ह सेक्सुअल एक्टला बिझनेसचं फ्यूचर मानत होता. सहपोलीस आयुक्त मिलिंद भांब्रे म्हणाले की, राज कुंद्राच्या हॉटशॉटसह अन्य साईट आणि App गुगल प्लेस्टोर आणि Apple वरून हटवले आहेत. राज कुंद्राचा दावा आहे की २०१९ ला ही कंपनी विकली होती.

Vian नावाची कंपनी प्रॉपर्टी सेलला फॉरेन करेंसी मिळत होती. राज कुंद्राचा फोन सीझ केला आहे. सध्या पोलीस आणखी तपास करत आहे. पोलिसांनी राज कुंद्राची रिमांड वाढवून मागितली. कोर्टाने २७ जुलैपर्यंत रिमांड वाढवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. याच प्रकरणात जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, राज कुंद्राशिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. हा सिनेमा राज कुंद्रा एका अ‍ॅपवर रिलीज करणार होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होती. इतकेच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त कंगना रणौत, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राचे देखील नाव घेतले. तुरूंगात जाण्याआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी कळले की बॉलिफेम नावाचे एक नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अ‍ॅपवर आम्ही रिअ‍ॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि चित्रपट दाखवण्याचा विचार करत होते

Read in English