पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 05:21 PM2020-05-30T17:21:34+5:302020-05-30T17:37:10+5:30

भाग मिल्खा भाग हा फरहान अख्तरच्या करिअरमधील एक खूपच वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी त्याने त्याच्या शरीरयष्टीपासून ते संवादफेकीपर्यंत सगळ्याच गोष्टीवर प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी त्याने केवळ ११ रुपये घेतले होते.

भाग मिल्खा भाग या चित्रपटात फरहान अख्तरच्या नायिकेच्या भूमिकेत आपल्याला सोनम कपूरला पाहायला मिळाले होते. तिने देखील या चित्रपटासाठी केवळ ११ रुपये इतकेच मानधन घेतले होते.

राजश्री प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान खानने आजवर काम केले आहे. प्रेम रतन धन पायो या चित्रपटाची कथा सलमानला भावल्याने त्याने या चित्रपटासाठी मानधन घेतले नव्हते. एवढेच नव्हे तर सन ऑफ सरदार या चित्रपटात काम करण्यासाठी देखील सलमानने एक रुपया देखील घेतला नव्हता. या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

शाहरुख खानने क्रेझी ४, भूतनाथ रिटर्न्स, दुल्हा मिल गया यांसारख्या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने कोणतेच मानधन आकारलेले नाही.

मंटो या चित्रपटाची कथा नवाझुद्दीनला इतकी आवडली होती की, त्याने केवळ एक रुपये इतके मानधन या चित्रपटासाठी घेतले.

ब्लॅक या चित्रपटाची पटकथा, या चित्रपटातील राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय या सगळ्याच गोष्टींची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटासाठी अमिताभ यांनी एकही रुपया घेतला नव्हता.

हैदर या चित्रपटात प्रेक्षकांना शाहिद कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले होते. या चित्रपटासाठी शाहिदने मानधन घेतले नव्हते.