चित्रपटांमध्ये कमी काम करत असले तरी मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे आहे करोडोने संपत्ती

Published: March 8, 2021 06:17 PM2021-03-08T18:17:25+5:302021-03-08T18:25:25+5:30

मिथुन चक्रवर्ती गेली 40 वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत आहे, कोलकाता येथे 16 जून 1950 रोजी जन्मलेल्या मिथुन यांचे खरे नाव गौरंग चक्रवर्ती आहे.

मिथुन यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे.

मिथुन यांचा मुंबईशिवाय ऊटी येथे आलिशान बंगला आहे.मीडिया रिपोर्टनुसार जवळपास 258 कोटींची संपत्ती आहे.

त्यांच्या मुंबईतील घरात जवळपास ३८ कुत्रे त्यांनी पाळले असून उटीच्या बंगल्या ७६ पाळीव कुत्रे आहेत.

मिथुन ग्रुप ऑफ होटल्स मोनार्कच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध असणा-या माहितीनुसार ऊटीमधील हॉटेलमध्ये 59 रूम, 4 लग्जरी फर्निश्ड सुइट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेजर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ ब्वॉय बार एंड डिस्कोसह, किड्स कॉर्नर सारख्या सुविधा आहेत.

मोनार्क सफारी पार्क मसिनागुड़ीमध्ये 16 बंगले, 14 ट्विन्स मचान, 4 स्टँडर्ड रूम, मल्टीकुजीन रेस्टोरेंट आणि चिल्ड्रन प्ले ग्राउंडसह घोडेस्वारी करण्याची सोय, जीपमधून जंगल सफारी सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!