अतरंगी रे... रणवीर सिंगचे 15 अतरंगी आऊटफिट्स, पाहून वेडे व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:49 PM2020-07-06T12:49:29+5:302020-07-06T13:32:46+5:30

सतरंगी, अतरंगी...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो

कधी विविध रंगाच्या टोप्या, हटके गॉगल्स, शूज, रंगीबेरंगी कपडे अशा सगळ्या अवतारामुळे रणवीर सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो

रणवीरचे आउटफिट्स नेहमीच वेगळे असतात. परंतु, अनेकदा त्याला आपल्या कपड्यांच्या फॅशनमुळे ट्रोल व्हावे लागले आहे.

ब-याचदा रणवीर सिंगच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर त्याची खिल्लीही उडवली जाते.

मस्तमौला रणवीर त्याला आवडेल तेच करतो.

रणवीर कुठलीही स्टाईल कॅरी करायला मागे पुढे पाहत नाही.

लोक काहीही बोलोत, त्याला जराही फरक पडत नाही.

कदाचित त्याचा हाच बिनधास्तपणा त्याच्या चाहत्यांना भावतो.

अवार्ड शोमध्ये रणवीर अशा काही थाटात पोहोचतो, की त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळतात.

त्याचे अतरंगी ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

अलीकडे रणवीर त्याच्या अतरंगी फॅशन सेन्सबद्दल बोलला होता.

मला माझी फॅशन आवडते. मी मुळात असाच आहे. कॉलेजच्या दिवसांतही मी असेच कपडे घालायचो. बॉलिवूडमध्ये नवा नवा आलो, तेव्हा मी लोकांच्या इच्छेनुसार, सुरक्षित पर्याय निवडले. कदाचित त्यावेळी मी टीकेला घाबरायचो. पण पुढे पुढे मी आहे तसा वागू लागलो. यानंतर माझी फॅशन जज केली जातेय, ही भीती कुठल्या कुठे पळून गेली, असे रणवीर या मुलाखतीत म्हणाला होता.

तूर्तास रणवीर सिंग ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे.

या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.