SEE PICS : हिच्या प्रेमात कंगाल झाला होता प्रभुदेवा, आता या दिग्दर्शकावर झाली फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 08:00 AM2020-11-18T08:00:00+5:302020-11-18T08:00:02+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिने साऊथ सिनेमात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. आज नयनताराचा वाढदिवस.

2003 मध्ये मल्याळम चित्रपटापासून फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे.

नयनताराने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. हीच नयनतारा एकेकाळी प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. ही लव्हस्टोरी कधी नव्हे इतकी गाजली होती. पण सरताशेवटी ती अधुरी राहिली.

नयनतारा व प्रभुदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभुदेवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते, त्यानुसार पत्नी व मुलांना सोडून प्रभुदेवा नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला होता.

प्रभुदेवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केले तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीही लताने दिली.

या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. यातून सहीसलामत सुटण्यासाठी आमच्यात असे काहीही नाही, असे नयनताराने अगदी शिरजोरपणे सांगितले होते.

पण प्रभुदेवापासून दूर राहणे नयनताराला शक्य नव्हते. प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मही स्विकारला होता.

अखेर नयनतारासाठी प्रभुदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभुदेवाला १० लाख रुपए, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले.

यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा प्रभुदेवाचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभूदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

हीच नयनतारा आता साऊथ दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे कळतेय.

विग्नेश आणि नयनतारा यांनी त्यांची रिलेशनशिपची अधिकृत घोषणा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केली होती. दोघे रेड कार्पेटवर आल्यानंतर त्यांनी आपली रिलेशनशिप जगजाहीर केली होते.

नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते.

Read in English