लिसा हेडन उगाच शेअर करत नाही गरोदरपणातील फोटो, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:48 PM2021-06-17T14:48:46+5:302021-06-17T15:01:29+5:30

अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिस-यांदा आई बनणार आहेत. साहजिकच तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटची जोरदार चर्चा आहे. याच लिसाचा आज वाढदिवस.

अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिस-यांदा आई बनणार आहेत. साहजिकच तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटची जोरदार चर्चा आहे. याच लिसाचा आज वाढदिवस.

17 जून 1986 रोजी चेन्नई येथे जन्मलेली लिसा भारतात कमी अन् भारताबाहेरच अधिक राहिली आणि गरोदरपणामुळे चर्चेत राहिली.

लिसाला आधीच दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांच्या वेळी प्रेग्नंट असताना लिसाने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे बोल्ड फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला होता. अनेक मॅगझिनसाठी तिने प्रेग्नंसी फोटोशूट केले होते.

आता लिसा तिस-यांदा प्रेग्नंट आहे आणि पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटची चर्चा आहे.

बेबी बम्पचे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे लिसा अनेकदा ट्रोलही होते, पण तिला त्याची पर्वा नाही. लोक काय बोलतात याने लिसाला जराही फरक पडत नाही. कारण मॉडेलिंग आणि सिनेमामुळे जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकी प्रसिद्धी या प्रेग्नंसी फोटोशूटने तिला दिली आहे.

जगातील मोठमोठ्या मॅगझिनवर लिसाच्या बेबी बम्पचे फोटो दिसतात ते म्हणूनच. साहजिकच यासाठी ती कोट्यवधी रूपये वसूल करते.

लिसाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात ‘आयशा’ या चित्रपटापासून केली. यानंतर, ती क्वीन, द शौकीन्स, हाऊसफुल 3 आणि ए दिल है मुश्किल अशा अनेक चित्रपटात दिसली.

तिचे बहुतांशी चित्रपट सुपरहिट ठरले. परंतु या चित्रपटाचे श्रेय मिळाले भलत्यालाच. याला वैतागून अखेर लिसाने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आणि लग्न थाटून मोकळी झाली.

लिसाने 2016मध्ये लग्न गाठ बांधली होती. तिचे लग्न ब्रिटिश व्यावसायिक दिनो लालवाणीशी झाले होते. दिनो हा पाकिस्तानी वंशाचा व्यापारी गुल्लू लालवाणीचा मुलगा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!