Birth Anniversary : अन् चार्ली चॅप्लिनचा मृतदेह चोरी गेला..., वाचा काय होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:35 AM2021-04-16T10:35:07+5:302021-04-16T10:44:29+5:30

charlie chaplin Birth Anniversary : चार्ली चॅप्लिन बर्थ डे स्पेशल : लोकांना हसवणा-या चेह-या मागचं दु:ख

‘मेरा दर्द किसी के लिए हंसने की वजह हो सकता है, पर मेरी हंसी कभी भी किसी के दर्द की वजह नहीं हो सकती,’ असे म्हणणारा आणि याच तत्त्वानुसार जगणारा चार्ली चॅप्लिन हा महान विनोदवीर आजच्याच दिवशी जन्मला होता. 16 एप्रिल 1889 रोजी जन्मलेल्या चार्लीची आज 132 वी जयंती. दु:खातही कसे हसायचे, हे शिकवणारा चार्ली महान विनोदवीर होताच, माणूस म्हणूनही तो तेवढाच महान होता. (charlie chaplin Birth Anniversary)

चार्लीचे बालपण फार गरिबीत आणि कष्टात गेले़ आई त्याचें पूर्ण नाव चार्ल स्पेंसर चॅप्लिन असे होते. त्याची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्याने त्याला वयाच्या नवव्या वषार्पासूनच पोट भरण्यासाठी काम करावे लागले होते. चार्लीचे आई-वडिल हे चार्ली लहान असतानाच वेगळे झाले होते. 13 व्या वर्षी त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

चालीर्ने फार कमी वयातच एक कॉमेडियन म्हणून नाटकात काम करणे सुरु केले होते. नंतर तो केवळ 19 वर्षांचा असताना त्याला एका अमेरिकन कंपनीने साईन केले आणि ती कंपनी त्याला अमेरिकेला घेऊन गेली. अमेरिकेत जाऊन चार्लीने सिनेमासाठी काम करणे सुरु केले आणि मोठा कलाकार म्हणून लोकप्रिय झाला.

‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा चार्ली चॅप्लिनचा पहिला सिनेमा 1914 मध्ये आला होता. त्याचा ‘द किड’ हा पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा 1921 मध्ये आला होता. चार्लीने आपल्या आयुष्यात दोन महायुद्धे पाहिली होती. जग जेव्हा युद्धात रक्ताने रंगले होते, तेव्हा चार्ली लोकांच्या चेह-यावर हास्य पेरत होता.

आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये चार्ली अनेक वादांमध्ये अडकला होता. 1940 मध्ये आलेला ‘द ग्रेट’ हा सिनेमा चांगलाच वादात सापडला होता. कारण त्यात त्याने अ‍ॅडॉल्फ हिटलरची भूमिका साकारली होती. नंतर अमेरिकेत त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचे आरोपही लावण्यात आले. त्याची एफबीआयकडून चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर चार्लीनेअमेरिका सोडले आणि तो स्विर्त्झलंडमध्ये जाऊन स्थायिक झाला.

चार्लीचे खाजगी आयुष्य फारच उलथापालथीचं राहिलं. त्याने एकूण 4 लग्ने केली होती. या लग्नातून त्याला 11 अपत्ये झाली. त्याने पहिले लग्न 1918 मध्ये मिल्ड्रेड हॅरीससोबत केले होते. पण हे लग्न केवळ 2 वर्ष टिकले. त्यानंतर त्याने लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि 1943 मध्ये 18 वर्षाच्या उना ओनीलसोबत लग्न केले, त्यावेळी चार्ली चॅपलिन 54 वर्षांता होता. त्याची सर्वच लग्ने वादग्रस्त ठरलीत.

1977 साली वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसात त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. काही चोरट्यांनी कबर खणून त्यांचा मृतदेह चोरला. पैसे उकळण्यासाठी ही विचित्र चोरी करण्यात आली होती.

चोरांनी तब्बल 11 महिेने मृतदेहाला आहे त्याच परिस्थितीत सांभाळून ठेवलं होतं. नंतर त्याचा मृतदेह मिळाला आणि पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून 6 फूट काँक्रिट खाली पुरण्यात आला होता.

चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे आहे. हा एक डॉक्युमेंट्री प्रकारातील चित्रपट आहे.