PHOTOS : अशी सुरु झाली करण सिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूसोबत ७ वर्षांपूर्वी असा थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:00 PM2021-02-23T14:00:00+5:302021-02-23T14:04:43+5:30

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. (Photo Instagram )

आज (२३ फेब्रुवारीला) करण सिंग ग्रोव्हरचा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी बिपाशा नवऱ्यासोबत मालदीवला गेली आहे. (Photo Instagram )

बिपाशा व करण सिंग ग्रोव्हरने ३० एप्रिल, २०१६मध्ये लग्न केले. (Photo Instagram )

अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. (Photo Instagram )

रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. (Photo Instagram)

अलोनशिवाय करण सिंग ग्रोव्हर हेट स्टोरी ३, थ्रीदेवमध्ये दिसला आहे.(Photo Instagram )

करण सिंग ग्रोव्हरने कसौटी जिंदगी की २ मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका केली होती.(Photo Instagram )