भूमी पेडणेकरवर बहीणच पडतेय भारी, दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:00 PM2021-02-18T14:00:34+5:302021-02-18T14:08:57+5:30

भूमी पेडणेकरने अल्पावधीतच अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.आपल्या अभिनयाने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय.

तिच्या लुकवर अनेकजण फिदा असता. पण तुम्हाला माहित आहे की भूमी पेक्षा लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण तिला टक्कर देते.

सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

भूमीने नुकतेच तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

पण तरीही या फोटोमध्ये तिची बहीणच भाव खाऊन जाते. सौंदर्याच्या बाबतीत भूमीची बहीणच तिच्यावर वरचढ ठरते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

भूमीच्या बहीणीचे नाव समीक्षा पेडणेकर असे आहे.

दोन्ही बहिणींनी स्टायलिश लेंहगा परिधान करुन ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

भूमीचा हा फोटोमुळे बहीण समीक्षा बहीण सध्या खूप चर्चेत आली आहे.

लाईक्स आणि कमेंटस देत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

भूमीप्रमाणे समीक्षादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय की काय अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.

त्यामुळे आगामी काळात समीक्षा सिनेमात झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.