PHOTOS : बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:34 PM2021-04-12T13:34:21+5:302021-04-12T13:44:17+5:30

Baftas 2021 red carpet: बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियंका चोप्राला पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियंका चोप्राला पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

या सोहळ्यात प्रियंका दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसली. तिचा हा बोल्ड लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले नसतील तर नवल.

या सोहळ्यात प्रियंका प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. पती निक जोनससोबत प्रियंकाने स्टायलिश अंदाजात रेड कार्पेटवर एण्ट्री घेतली.

या खास सोहळ्यासाठी प्रियंकाने काळ्या रंगाचा फिशकट स्कर्ट परिधान केला होता. प्रियंकाचा हा बोल्ड लूक रोनाल्ड व्हान डेर केम्प यांनी प्रियांकाचा हा ड्रेस डिझाइन केला होता.

प्रियांकाचा दुसरा लूक पटेर्गाझ या स्पॅनिश डिझायनरने डिझाइन केला होता. गुलाबी रंगाचे जॅकट आणि पांढ-या रंगाची धोती पॅण्ट असा तिचा लूक होता.

फ्रंट ओपन जॅकेटमधील तिच्या या लूकमध्ये प्रियंकाने डॅशिंग एण्ट्री केली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

काहींनी तिला या लूकवरून ट्रोलही केले. पण अनेकांनी तिच्या या बोल्ड लूकचे कौतुकही केले.

तिने शेअर केलेल्या फोटोंना अवघ्या काही तासातं लाखों लाईकस् मिळाले आहेत.

सध्या प्रियंकाचा बाफ्ता सोहळ्यातील स्टायलिश लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.