गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:39 AM2020-08-07T11:39:13+5:302020-08-07T11:49:54+5:30

भावी पत्नीच्या डोळ्यांत हरवला राणा...

‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका निभावणारा अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत.

उद्या 08 ऑगस्ट रोजी राणा व मिहिका बजाज लग्नगाठ बांधणार आहेत.तूर्तास राणा व मिहिकाच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.

या सेरेमनीत राणा व मिहिका दोघेही धम्माल मस्ती करताना दिसले. त्यांचा रोमॅन्टिक अंदाजही पाहायला मिळाला.

मिहिका या फोटोंमध्ये सिल्व्हर-यॅलो आउटफिटमध्ये आहे. तर राणा ट्रॅडिशनल अवतारात आहे.

मिहिकाने हळदीसाठी काही वेगळ्या प्रकारचे दागिने निवडले. त्या दागिण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मिहिका बजाजचे विविध पोजमधील फोटो यावेळी व्हायरल होत आहेत.

कोरोना काळात त्यांच्या लग्नासाठी फक्त 30 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

कोरोनामुळे या लग्नासाठी केवळ घरातील सदस्यांना निमंत्रण दिले आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील जवळच्या मित्रांना देखील निमंत्रण नाही.तेलुगू आणि मारवाडीअशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार आहे. खुद्द राणने ही माहिती दिली आहे

मे महिन्यात राणा दग्गूबातीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत साखरपुड्याबाबत माहिती दिली होती.

मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे.

Read in English