हा प्रसिद्ध अभिनेता आहे अश्विनी काळसेकरचा पती, अनेक चित्रपटात केले आहे एकत्र काम

Published: January 22, 2021 06:00 AM2021-01-22T06:00:00+5:302021-01-22T06:00:02+5:30

अश्विनी कळसेकरने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले.

अश्विनीला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली.

अश्विनीने या मालिकेनंतर कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

तिने मालिकांप्रमाणेच मुसाफीर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अश्विनीचे लग्न मुरली शर्मासोबत झाले आहे.

मुरली शर्माने मकबूल, मार्केट, मैं हूँ ना, अपहरण, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

गोलमाल या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते.

मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहाणेच पंसत करतो.

अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी 2009 मध्ये लग्न केले. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!