सुशांतच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरली नाही अंकिता, रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 07:00 AM2020-07-10T07:00:00+5:302020-07-10T07:00:02+5:30

सुशांतवर अंकिताचे जीवापाड प्रेम होते. त्यामुळे सुशांतच्या निधनाला वीस दिवस उलटून गेलेले असतानाही अद्याप ती या धक्क्यातून सावरलेली नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला जबर धक्का बसला आहे.

सुशांत जाऊन आज इतके दिवस उलटून गेलेले असतानाही तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबलेले नाहीत.

अंकिता सतत रडते आहे. क्षणभरासाठीही तिचे अश्रू थांबलेले नाही, असा खुलासा अंकिताचा मित्र संदीप सिंगने केला आहे.

फोनवर बोलतानाही ती आपले अश्रू रोखू शकत नाहीये.

अंकिता प्रचंड इमोशनल आहे, याचमुळे सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती सावरू शकलेली नाही.

अंकिता सुशांतवर जीवापाड प्रेम करायची. त्याची अगदी आईसारखी काळजी घ्यायची, असे संदीप सिंगने सांगितले.

सुशांतच्या आवडीनुसार, तिने तिचे घर सजवले होते. त्याच्या आवडीच्या जेवणापासून तर त्याच्या गरजेच्या प्रत्येक वस्तूची काळजी ती घ्यायची.

सुशांतला वाचनाची आवड होती़ अंकिता कुठेही गेली तरी सुशांतसाठी पुस्तके खरेदी करायची.

सुशांतच्या निधनापासून अंकिता सातत्याने चर्चेत येत आहे.

इतकेच नाही तर सुशांतचे चाहते त्याच्या निधनासाठी अंकिताला जबाबदार ठरवत आहेत.

त्यात अंकिता व सुशांतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुशांत व अंकिता जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते.

त्यात आता अंकिताचे लाल रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.