ये खुली वादियाँ... ये खुला आसमाँ.....मिलिंद अंकिताचे हे फोटो देतायेत कपल गोल, SEE PIC

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 01:27 PM2020-08-08T13:27:24+5:302020-08-08T13:53:28+5:30

बॉलीवुडचे ते कपल जे आजही समोरा समोर आले की चर्चा होतात. मिलिंद सोमण आणि अंकित कुंवर ही जोडी अजब- गजब वाटत असली तरी त्यांच्या खूप मस्त अशी केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते.

मिलिंद सोमण आणि अंकिता सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.

त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते.

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.

त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.

नेहमीच एकमेकांसह फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली देत असतात.

अंकिता देखील प्रत्येक निर्णयात मिलिंदसोबत असते, त्याला पाठिंबा देते.

ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं.

दोघांनाही भटकंतीची खूप आवड आहे. सतत हे दोघे आऊटिंगला जात असतात.

निसर्गाच्या सान्निध्यात साहसी धाडसी जगणं, भटकंती करणं यातून आपल्याला आनंद मिळतो हे सांगायलाही ते विसरत नाहीत.