अंग्रेजी मीडियमच्या स्क्रिनिंगला पोहोचले हे सेलिब्रेटी, मात्र चित्रपटातील हे स्टार होते गायब

Published: March 12, 2020 07:14 PM2020-03-12T19:14:59+5:302020-03-12T19:26:21+5:30

अंग्रेजी मीडियमच्या स्क्रिनिंगला रकुल प्रीत सिंगने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली राधिका मदन देखील स्क्रिनिंगला दिसली.

अंग्रेजी मीडियम या चित्रपटात इरफान खान आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट हिंदी मीडियम या चित्रपटाचा सीक्वल आहे.

अंग्रेजी मीडियमच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली असली तरी करिना कपूर आणि इरफान खान कुठेच दिसले नाही.

इरफान खानला काही दिवसांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर तो उपचारासाठी परदेशात होता. इरफान या चित्रपटाच्या प्रमोशनपासून देखील दूर राहाणेच पसंत केले होते.

अंग्रेजी मीडियम या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला करिना आणि इरफानची कमतरता नक्कीच जाणवत होती.

करिना आणि इरफान स्क्रिनिंगला न दिल्यामुळे त्याची चर्चा सोशल मीडियावर देखील रंगली होती.

करिना आणि इरफानने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!