'गहराइयां' फेम अनन्या पांडेनं केलं ग्लॅमरस फोटोशूय, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:57 PM2022-05-13T18:57:40+5:302022-05-13T18:57:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे स्टायलिश फोटोशूट पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

'स्टूडेंट ऑफ द ईयर-2′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली.या चित्रपटाला 'बेस्ट डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता (फोटो इन्स्टाग्राम)

. याशिवाय 'पति, पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या.(फोटो इन्स्टाग्राम)

काही महिन्यांपूर्वी अनन्या पांडे 'गेहरियाँ' चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत दिपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी झळकले होते (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडे लवकरच विजय देवरेकोंडासोबत 'लायगर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा अ‍ॅक्शन अवतारात तर अनन्या पांडे ग्लॅमरस लूकमध्ये झळकणार आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या पांडे तिच्या फिटनेसबद्दल खूप सक्रिय आहे आणि तिचे वर्कआउट व्हिडिओ देखील शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर अनन्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ लगेच व्हायरल होताना दिसतात. (फोटो इन्स्टाग्राम)