RRR : फक्त 15 मिनिटांचा रोल, 10 दिवस शूटींग अन् आलियाची फी किती? तर डोळे पांढरे होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:58 PM2021-11-28T17:58:09+5:302021-11-28T18:04:39+5:30

आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सनी तो फुलासारखा झेलला, असं म्हणायला हरकत नाही.

आलिया भट आता मोठी स्टार झालीये. अगदी बडी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. साहजिकच नाव जितकं मोठं, तितके दाम मोठे.

आम्ही बोलतोय ते आलियाचा आगामी सिनेमा ‘आरआरआर’ बद्दल. बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमात आलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘आरआरआर’ सुपरस्टार राम चरण रामचरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. आलियाने यात राम चरणची पत्नी अल्लुरी सीता हिची भूमिका साकारली आहे.

म्हणायला ही भूमिका फार मोठी नाही. या चित्रपटासाठी आलियानं किती दिवस शूटींग केलं तर मोजून 10 दिवस. पण फी म्हणाल तर कोटी रूपये.

होय, चित्रपटात आलिया केवळ 15 मिनिटांसाठी दिसणार आहे आणि या 15 मिनिटांसाठी तिनं तगडी फी वसूल केली आहे.

होय, या 15 मिनटांच्या भूमिकेसाठी आलियानं तब्बल 6 कोटी रूपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

आलिया राजामौली यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी येताच तिने होकार दिला. अर्थात 6 कोटींच्या बदल्यात. विशेष म्हणजे टॉलिवूडमध्ये एकाही अभिनेत्रीला लीड भूमिका करण्यासाठी इतकी फी मिळत नाही.

आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सनी तो फुलासारखा झेलला, असं म्हणायला हरकत नाही.