एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे अक्षय कुमारचे घर, खिडकीतून दिसतो अथांग समुद्र, पाहा घराचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:00 AM2021-04-15T06:00:00+5:302021-04-15T06:00:02+5:30

अक्षय कुमार पत्नी ट्विंकल आणि दोन मुलांसोबत मुंबईतील जुहू परिसरात राहातो.

अक्षय कुमारचे घर प्रचंड मोठे असून त्याचे इंटेरिअर देखील खूप चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. इंटेरिअर ट्विंकलने स्वतः केलेले आहे.

अक्षय कुमारचा गोव्यात तसेच कॅनडामध्ये देखील बंगला आहे.

अक्षय कुमारच्या घरात खालच्या मजल्यावर लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, किचन, होम थिएटर आहे.

अक्षय कुमारच्या घरात पहिल्या मजल्यावर अनेक बेडरूम्स, पँट्री, ट्विंकलचे ऑफिस असून एक भली मोठी बाल्कनी आहे.

अक्षय कुमारचे घर जुहू चौपाटीच्या अगदी समोर असून त्याच्या खिडकीतून अथांग समुद्र दिसतो.

अक्षयने घरात स्विमिंग पूलदेखील बनवला आहे. तसेच बंगल्याच्या आवारात गार्डन देखील आहे.