पत्नीसाठी स्वत: ड्राइव्हर बनला अक्षय कुमार, कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी

Published: March 30, 2020 04:23 PM2020-03-30T16:23:55+5:302020-03-30T16:32:44+5:30

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अख्या देश ठप्प आहे. तातडीच्या कामाशिवाय कुणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण अशात अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

अक्षय व ट्विंकलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ अक्षयची पत्नी ट्विंकलने स्वत:च तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात स्वत:च ड्रायव्हिंग करुन अक्षय तिला हॉस्पिटलमधून घेऊन येताना दिसत आहे.

माझ्या पायाचे हाड मोडल्याने आम्हाला तातडीने हॉस्पिटलमध्ये जावे लागले़ सध्या मुंबईचे सर्व रस्ते जवळपास रिकामे आहेत. ड्रायव्हरला सुट्टी असल्याने आज अक्षयच माझा ड्रायव्हर आहे, असे ट्विंकलने व्हिडीओत स्पष्ट केले़ होते.

या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या पायाला प्लास्टर केलेले पाहायला मिळाले होते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रुपये दान केल्याने त्याचे सर्वच स्तरातून अक्षय कुमारचे कौतुक होताना दिसत आहे.

अक्षयने २५ कोटी दान करण्याचे घोषित केल्यानंतर ट्विंकलने एक ट्वीट केले होते. त्यात तिने लिहिले होते की, ‘या व्यक्तिचा मला कायम अभिमान वाटतो. तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस? असे मी त्याला विचारले तेव्हा त्याचे उत्तर ऐकून मला त्याचा अभिमान वाटला. जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हते, मी स्वत: काहीही नव्हतो. पण आज माझ्याकडे सर्वकाही आहे. अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देतांना मागे-पुढे का पाहावे? ज्यांच्याकडे आज काहीच नाही, त्यांना मी मदतीचा हात देतोय, असे अक्षय मला म्हणाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!