After sister Shaza, Zoa Morani also tests positive for Covid-19 PSC
शाहरुख खानच्या नायिकेला झाली कोरोनाची लागण, नुकताच आला रिपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:55 PM2020-04-07T17:55:00+5:302020-04-07T17:55:02+5:30Join usJoin usNext निर्माते करीम मोरानी यांची लहान मुलगी शजा मोरानीची कालच कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. पण आता शजाची मोठी बहीण अभिनेत्री जोया मोरानीची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुरुवातीला जोयाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. पण शजाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शजासोबतच जोयाला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघींवर वेगवेगळ्या रुग्णालात उपचार सुरू आहेत. जोयाने आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खान प्रोडक्शनच्या ऑल्वेज कभी कभी सिनेमातून केली होती. सध्या संपूर्ण मोरानी कुटुंब कोरोनाच्या दहशतीखाली आहे. कुटुंबातील नऊ लोकांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. शजा आणि जोया दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मोरानी कुटुंबियांतील सगळेच टेन्शनमध्ये आले आहेत. जोया मार्च मध्ये जयपूरला गेली होती तर शजा श्रीलंकेला गेली होती. मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरुख खानसोबत मोरानी कुटुंबियांची चांगली मैत्री आहे. शाहरुखच्या अनेक सिनेमांचे ते निर्माते आहेत. 2015 मध्ये आलेल्या 'दिलवाले' सिनेमाची निर्मिती देखील त्यांनी केली होती.टॅग्स :शाहरुख खानShahrukh Khan