मिलिंद सोमणनंतर आता ही बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत, सोशल मीडियावर घालतेय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:42 PM2020-11-19T13:42:04+5:302020-11-19T13:46:46+5:30

आपल्या बोल्ड आणि बिनधास्त तसेच आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी वेड लावणारी अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अ‍ॅमीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोत अ‍ॅमी टॉपलेस दिसत आहे.

अलीकडेच तिने एक सुंदर फोटोशूट केले. त्यातलेच काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोत अ‍ॅमी खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे.

अ‍ॅमीने यापूर्वी तिचे बोल्ड फोटोही शेअर केले आहेत. पण त्या फोटोंमधला अंदाज हा पूर्णपणे वेगळा होता.

यावेळी ट्रेंड होणारा फोटो हा ही वेगळ्या अंदाजतला असून सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

अ‍ॅमीच्या या टॉपलेस फोटोला चार लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

चाहत्यांनीही या फोटोंवर वेगळी आपल्या प्रतिक्रिया देत पसंती दिली आहे.

प्रत्येकजण तिचा हा अंदाज पाहून फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अ‍ॅमी जॅक्सनसुद्धा आपल्या एक वर्षाच्या मुलाची अनेक फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.

कोरोना काळात तिने आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय केला आहे. या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली होती.

अभिनेता मिलिंद सोमणनेही सोशल मीडियावर एक बीचवर न्युड रन करताना फोटो शेअर केला होता.

मिलिंद नंतर अ‍ॅमी देखील न्युड फोटोशूटमुळे पब्लिसिटी मिळवत आहे.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.