रिया की तो निकल पडी...! ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट द्रौपदीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:43 PM2021-06-10T15:43:11+5:302021-06-10T15:57:57+5:30

रिया चक्रवर्तीने दीपिका पादुकोण- आलिया भट्टलाही टाकले मागे, बनली मोस्ट डिजायरेबल वुमन

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या घसरलेली करिअरची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीची इमेज खराब झाली. तिला तुरुंगाचीही हवा खावी लागली. सध्या ती जामीनावर बाहेर आहे.

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेली रिया सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, नुकतीच रियाची सर्वात आकर्षक महिलांमध्ये निवड झाली आणि याचसोबत रियाच्या करिअरची गाडीही रूळावर येण्याची चिन्ह दिसू लागलीत.

‘द टाइम्सने’ 50 मोस्ट डिजायरेबल वुमन 2020 यादी जाहीर केली आहे. यात रियाने आलिया भट, दीपिका पादुकोण अशा बड्या बड्या अभिनेत्रींना पछाडत अव्वल स्थान मिळवले आहे.

यानंतर रियाला बॉलिवूडच्या ऑफर मिळाल्याचे कळतेय. होय, महाभारत कथेवर आधारीत एका चित्रपटासाठी दौपदीचा रोल आॅफर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. हा महाभारत आणि दौपदीच्या कथेवर आधारीत आगळा वेगळा चित्रपट असणार आहे.

चित्रपटाची कथा महाभारतावर बेतलेली असतील तरी ही आधुनिक जगाची कथा असणार आहे. यात रियाला दौपदीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आहे. अर्थात अद्याप हा चित्रपट सुरुवातीच्याच टप्प्यात आहे.

मोस्ट डिजायरेबल वुमन 2020 यादीत रिया अव्वल स्थानी तर दुस-या नंबरवर एडलिन कैस्टेलिनो आहे. 2020 मध्ये ती मिस यूनिवर्सची तिसरी रनरअप ठरली होती.

तिस-या नंबरवर दिशा पाटनी, चौथ्या नंबरवर कियारा आडवाणी आणि पाचव्या नबंरवर दीपिका पादुकोणचे नाव समोर आले आहे. याव्यरिरिक्त सहाव्या नंबरवर कैटरीना कैफ, सातव्या नंबरवर जैकलीन फर्नांडिस, आठव्या नंबरवर अनुप्रिया गोएनका, तर रूही सिंह दहाव्या नंबरवर आवित्रि चौधरीने बाजी मारली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!