कधीकाळी व्हीजे होती रिया चक्रवर्ती, सुशांतआधी या अभिनेत्याशी जुळले होते नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:37 PM2020-06-29T13:37:51+5:302020-06-29T15:11:33+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती हे नाव चर्चेत आहे. यापूर्वी कधीही कोणीही रियाबद्दल जाणून घेण्याचा इतका प्रयत्न केला नसावा.

रियाने तिच्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवरचा रिअ‍ॅलिटी शो ‘टीन दिवा’पासून केली होती. या शोची ती रनरअप होती.

यानंतर एमटीव्हरचे अनेक शो तिने होस्ट केलेत.

रियाने बँड बाजा बारात या सिनेमासाठी आॅडिशन दिले होते. पण यात ती रिजेक्ट झाली होती.

सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही लवकरच लग्न करणार होते, असे कळतेय. सुशांतआधी रियाचे नाव अभिनेता आदित्य राय कपूरसोबत जोडले गेले होते.

रिया व आदित्य अनेकदा एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.

मेरे डॅड की मारूती या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

2012 मध्ये तिने तुनेगा तुनेगा या चित्रपटातून तेलगू सिनेमात डेब्यू केला होता.

यानंतर सोनाली केबल या बॉलिवूडच्या सिनेमातही ती झळकली.

अलीकडे ‘जलेबी’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता.

रिया अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. पण अद्यापही तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

चित्रपटांपेक्षा सुशांतसोबतच्या अफेअरमुळेच ती अधिक चर्चेत आली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी रियाची चौकशी केली होती.