मौनी रायने एक-दोन नाही तर 7 वेळा केली कोरोना टेस्ट, पण का?

By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 04:32 PM2020-10-13T16:32:07+5:302020-10-13T16:39:58+5:30

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना मौनी काय करत होती तर...

अभिनेत्री मौनी रायने गेल्या काही महिन्यांत 7 वेळा कोरोना टेस्ट केली. का तर मौनीच्या पायाला सध्या जणू भिंगरी लागलीय.

होय,जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना मौनी काय करत होती तर वेगवेगळे देश फिरत होती.

यादरम्यान ती अनेकदा दुबईला गेली, ब्रिटनला गेली. मालदीवला गेली. दुबईत तर तिने बरेच दिवस घालवले.

दुबईत बहिणीकडे अनेक दिवस मुक्काम केल्यानंतर मौनी एका वेब शोच्या शूटींगसाठी ब्रिटनला गेली.

या शूटींगदरम्यान दरआठवड्याला कोरोना टेस्ट बंधनकारक होती. यामुळे मौनी अनेकदा कोरोना चाचणीला सामोरी गेली.

गेल्या 7 महिन्यांत तिने 7 कोरोना टेस्ट केल्यात. हा अनुभव कसा होता तर, वेदनादायी. होय, कोरोना टेस्ट खूप त्रासदायक व वेदनादायक आहे. पण ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी 7 महिन्यात 7 टेस्ट केल्यात असे मौनीने सांगितले.

अलीकडे मौनीचा वाढदिवस झाला. मौनीने मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. मालदीव येथेही मौनीने कोरोना टेस्ट केली.

मालदीवमध्ये पोहोचताच तुम्हाला कपडे बदलण्यास सांगितले जाते आणि लगेच तुमची कोरोना टेस्ट होते. दुस-या दिवशी सकाळी टेस्टचा रिझल्ट येतो. तो निगेटीव्ह असेल तरच तुम्हाला मालदीव फिरण्याची परवानगी दिली जाते. हा अनुभवही मौनीने शेअर केला.

आता मौनी मुंबईला आपल्या घरी परतली आहे. लवकरच ती ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात आलिया भट व रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Read in English