मल्लिका ते मर्डर गर्ल...! वाचा रिमाची ‘हिरोईन’ बनण्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 08:00 AM2020-10-24T08:00:00+5:302020-10-24T08:00:02+5:30

आज मल्लिकाचा वाढदिवस.

इम्रान हाश्मीसोबत मर्डर चित्रपटामध्ये दिलेल्या हॉट सीन्समुळे मल्लिका शेरावत चर्चेत आली. आज मल्लिकाचा वाढदिवस. मल्लिकाचे खरे नाम मल्लिका नसून रीमा लांबा आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर मल्लिकाने आपले नाव बदलले.

मल्लिकाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. यादरम्यान तिची ओळख पायलट करण सिंग गिलसोबत झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले मात्र फारकाळ ही लग्न टिकले नाही. करण आणि मल्लिका लग्नाच्या एकवर्षनंतर एकमेकांपासून वेगळे झाले.

काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाचा फोटो समोर आला होता. मात्र मल्लिकाने आपल्या लग्नाची गोष्ट कधीच स्वीकारली नाही.

मल्लिकाने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज झाले होते. मात्र त्यानंतर काहीकाळानंतर त्यांनी तिला स्वीकारले सुद्धा.

लग्नानंतर मल्लिका हरियाणासोडून मुंबईत आली. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न तिने पाहिले. घरच्यांचा अर्थातच विरोध होता. त्यामुळे मल्लिकाने एकटीच्या बळावर हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

काही वर्षांआधी मल्लिका साइरिल ऑक्जेनफेंस नामक फ्रेंच बिझनेसमनला डेट करत होती. मात्र तिचे हे नातेही संपुष्टात आले.

मल्लिकाने हिंदी चित्रपटांशिवाय इंग्लिश आणि चायनीज चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. मल्लिका खूप काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. एककाळ असा होती कि मल्लिकाकडे बॉलिवूडची सेक्स सिंबल म्हणून पाहिले जायचे.

तिने आपल्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये आलेल्या ख्वाहिश चित्रपटातून केली होती. मात्र मल्लिका प्रकाशझोतात आली ती मर्डर चित्रपटानंतर. त्यात तिने तब्बल 21 किसींग सीन्स दिले होते.