‘मैनें प्यार किया’मधील भाग्यश्रीची मुलगी दिसते तिच्याइतकीच सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:30 PM2020-07-05T14:30:00+5:302020-07-05T14:30:03+5:30

आईइतकीच ग्लॅमरस आहे अवंतिका

‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील सुमन अर्थात भाग्यश्रीला कोण विसरणार. या चित्रपटानंतर भाग्यश्रीच्या सौंदर्याच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. सध्या आता भाग्यश्रीची लेक अवंतिका हिच्या सौंदर्याच्या चर्चा आहेत.

पहिल्याच सिनेमातून भाग्यश्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पहिल्या सिनेमानंतर तिने काही सिनेमांमध्ये काम केले आणि लगेच लग्न करुन संसार थाटला. याच भाग्यश्रीच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

भाग्यश्रीची मुलगी अवंतिका सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

रोज नवे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

मध्यंतरी अवंतिकाही सिने इंडस्ट्रीत येणार अशी चर्चा सुरु होते.

अवंतिकाला सलमान खान लॉन्च करणार, अशीही चर्चा होती.

अवंतिकाने लंडनच्या कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.

एकीकडे तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होतीये तर दुसरीकडे ती वडीलांप्रमाणे बिझनेसमध्ये जाणार असेही बोलले जात आहे.

भाग्यश्रीला एक मुलगाही आहे. अभिमन्यू असे त्याचे नाव. अभिनमन्यूचा कधीच बॉलिवूड डेब्यू झलाय

अभिमन्यू प्रमाणे अवंतिकानेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी असे बोलले जात आहे.