आमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:38 PM2020-04-01T16:38:14+5:302020-04-01T16:54:23+5:30

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमेऱ्यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत.

इराने नुकताच एक विमानतळावरचा तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

सध्या लॉकडाऊन असताना इरा कुठे चालली आहे असा प्रश्न काही जणांना पडला आहे तर काहींच्यामते ती सुपरस्टारची मुलगी असल्याने तिच्यासाठी या परिस्थितीत देखील प्रवास करणे शक्य आहे.

इराच्या या फोटोवर कमेंटचा अक्षरशः वर्षाव होत आहे. एवढेच नव्हे तर तुझे मास्क कुठे आहे असे देखील नेटिझन्स तिला विचारत आहेत.

इराने पोस्ट केलेल्या या फोटोत टी-शर्ट घातला असून त्यावर अल्लाह असे लिहिले आहे. त्यावरून देखील तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

इराच्या या टी-शर्टसाठी तिला ट्रोल केले जात असले तरी क्रिकेटवर युवराज सिंगने तिच्या या टी-शर्टचे कौतुक केले आहे.

इराचा हा फोटो जुना असून हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ट्रोलिंग करणाऱ्यांना फुकटचे आमंत्रण दिले आहे असेच म्हणावे लागेल.